वाल्याचे वाल्मिकी तयार करणारा पक्ष म्हणजे भाजप-अशोक चव्हाणांची टीका

वाल्याचे वाल्मिकी तयार करणारा पक्ष म्हणजे भाजप-अशोक चव्हाणांची टीका

हे सरकार म्हणजे सर्व सामान्य जनतेला कोंडित पकडणारं सरकार आहे. भाजप म्हणजे वाल्याचे वाल्मीकि तयार करणारे सरकार आहे अशी टिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद,31 ऑक्टोबर:राज्य सरकारचा तीन वर्षांचा  कार्यकाल हा अपयशाचा आहे. गोंधळाचा आहे. हे सरकार म्हणजे सर्व सामान्य जनतेला कोंडित पकडणारं सरकार आहे. भाजप म्हणजे वाल्याचे वाल्मीकि तयार करणारा पक्ष  आहे. अशी टिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

औरंगाबादमध्ये त्यांनी ही टीका केली आहे.  दरम्यान काँग्रेसच्यावतीनं  याच विरोधात लवकरच जन आक्रोश मोर्चे काढण्यात येणार आहे. भाजप सरकारच्या 3 वर्षांच्या कारभाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येतोय.  या मोर्च्याची सुरुवात आजपासून अहमदनगरमधून होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते गुलाम नबी आझाद या मोर्च्यास उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात राज्यातील सर्वच काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे , पृथ्वीराज चव्हाण , राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थित जन आक्रोश मेळावा होणार आहे. नोटबंदी , जीएसटी , शेतकरी कर्जमाफीत घोळ , यामुळे जनतेच्या सर्वं स्तरात नाराजी आहे.या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी जन-आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय.

First published: October 31, 2017, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading