सेना-भाजपने बाबासाहेबांच्या नावाचं राजकारण केलं -अशोक चव्हाण
सेना-भाजपने बाबासाहेबांच्या नावाचं राजकारण केलं -अशोक चव्हाण
चव्हाण यांनी सरकरारवर तोंडसुख घेतलं आहे. इंदु मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभारण्याचं आश्वासन भाजपने सत्तेत येण्याआधी दिलं होतं. पण स्मारक मात्र अजूनही उभारलेलं नाही
14 एप्रिल: सेना-भाजप सरकारने राजकारणासाठी बाबासाहेबांच नाव वापरलं असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. इंदु मिल स्मारकाची घोषणा केली पण स्मारकाचं काम मात्र काहीच केलं नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती आहे. यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच निमित्ताने चव्हाण यांनी सरकारवर तोंडसुख घेतलं आहे. इंदु मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभारण्याचं आश्वासन भाजपने सत्तेत येण्याआधी दिलं होतं. पण स्मारक मात्र अजूनही उभारलेलं नाही. तसंच राज्यातील कायदा सुव्यस्था कोलमडली आहे आणि या साऱ्याला भाजपची मुकसंमती असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. तसंच मंत्रालयतच आता बाजार सुरू झाला आहे. गरिबांची कामं होत नाही आणि अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
दरम्यान नाणार प्रकल्प विरोधी कृती समितीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.