Home /News /maharashtra /

रितेश देशमुख घेणार अशोक चव्हाण यांची प्रकट मुलाखत

रितेश देशमुख घेणार अशोक चव्हाण यांची प्रकट मुलाखत

शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये महाराष्ट्राची मेगामुलाखत रंगणार आहे.

    नांदेड, १३ फेब्रुवारी : शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्ताने कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण  यांची मेगा मुलाखत सिने अभिनेता रितेश देशमुख घेणार आहेत. शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये महाराष्ट्राची मेगामुलाखत रंगणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध 'लय भारी' सिनेअभिनेते रितेश देशमुख हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमिता चव्हाण यांना बोलते करणार आहेत. स्व.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'स्व. शंकरराव चव्हाण- त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतून...'  या संकल्पनेतून शुक्रवारी १४ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता यशवंत महाविद्यालयाचे प्रांगण, नांदेड इथं हा कार्यक्रम होणार आहे. ‘आनंदाचे डोही’ असं नाव असलेल्या या मुलाखतीतून दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते? करड्या शिस्तीचे वक्ते असलेल्या ‘नानां’च्या हदयाचा हळवा कोपरा कोणता होता? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले? अशा अनेक पैलूंवर प्रकाश पडणार आहे. विशेष म्हणजे, राजकीय नेत्याची मुलाखत घेण्याची ही रितेश देशमुखची दुसरी वेळ आहे. याआधी मागील वर्षी दैनिक लोकमतच्या  'लोकमत पॉवर आयकॉन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्यात रितेशने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ashok chavan, Nanded, Riteish Deshmukh

    पुढील बातम्या