नांदेड, 28 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला (mva government 2 years) दोन वर्ष पूर्ण झाली आहे. एकीकडे सत्ताधारी जल्लोष साजरा करत आहे तर दुसरीकडे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मराठा आरक्षणावरून (Maratha reservation ) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. पण, चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणावरून आरोप करणे म्हणजे, चोराच्या उलट्या बोंबा आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पलटवार केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडवून ठेवला असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी उत्तर दिले.
2 वर्षीय चिमुकलीला कपाटात कोंडून दिल्या नरक यातना; औरंगाबादेतील संतापजनक घटना
'याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षणाचा कधीच अभ्यास नव्हता. आम्ही जेवढ्या गोष्टा दाखवल्या त्याच सर्वोच्च न्यायालयानेही नमूद केल्या आहे. राज्याला अधिकार नाही, पण भाजपचे लोक अधिकार असल्याचं सांगत होते. त्यांनी तसाच निर्णय घेतला आणि आमचा निर्णय योग्य असल्याचं सांगत आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीतर तो केंद्र सरकारला आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं.
Instagram वर पाहता येणार तुमचा Favorite Content; Setting मध्ये करा सोपे बदल
तसंच, कोर्टाने स्पष्ट केलं की, 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही. पण, चंद्रकांत पाटील यांनी लावलेला शोध हा कोणताच अभ्यास न करता आहे' असा टोलाही चव्हाण यांनी पाटलांना लगावला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
मुख्यमंत्री कोणतीही फाईल वाचल्याशिवाय करत नाहीत,मराठा आरक्षणासाठीची भोसले समिती काय करत आहे. या सरकारने मराठा आरक्षण रखडवून ठेवले आहे. ओबीसी जनगणनाच्या मागणीवरून भुजबळ वारंवार खोटं बोलत आहेत. डेटा गोळा करायला राज्याला काय अडचण आहे. दोन वर्षे झाले दोन दिवसांच्या पुढे अधिवेशन होईना. आमदारांनी काय चपात्या लाटत बसायचं का? असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.