मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /balasaheb thorat : बाळासाहेब थोरात पक्षाची साथ सोडतील का? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने दिले स्पष्ट उत्तर

balasaheb thorat : बाळासाहेब थोरात पक्षाची साथ सोडतील का? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने दिले स्पष्ट उत्तर

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आहे का पत्र आहे ते माहिती नाही. त्यांच्याशी कोणाशी बोलणे झाले नाही.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आहे का पत्र आहे ते माहिती नाही. त्यांच्याशी कोणाशी बोलणे झाले नाही.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आहे का पत्र आहे ते माहिती नाही. त्यांच्याशी कोणाशी बोलणे झाले नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India

नांदेड, 07 फेब्रुवारी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार असून काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वकाही करणार आहे, थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

विधान परिषद पदवीधर निवडणुकीमुळे बाळासाहेब थोरात कमालीचे नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करू शकत नाही, असं स्पष्टपणे बोलून दाखवलं. आज त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस नेते दुखावले गेले आहे. अशोक चव्हाण यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

'सकाळी मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा वाद मिटवण्यासाठी त्यांची मनधरणी करणार आहे. पण बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली.

'मला बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आताच कळालंय. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार असून काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वकाही करणार आहे, थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असंही चव्हाण यांनी म्हटलंय.

तर,. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आहे का पत्र आहे ते माहिती नाही. त्यांच्याशी कोणाशी बोलणे झाले नाही. काल अध्यक्षांसोबत होतो, त्यांनी सध्या काही माहिती दिली नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. हे सर्व तात्पुरते असते, सर्व ठीक होईल. काळजी करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

100 वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येते? - सत्यजीत तांबे

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. थोरात साहेबांनी जर पत्र लिहिलं असेल तर १०० वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येत आहे. यावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं परखड मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं.

(Chinchwad by-election : भाजपची विनंती आणि राज ठाकरेंच्या पत्राला केराची टोपली, राष्ट्रवादीकडून अखेर चिंचवडमध्ये उमेदवार जाहीर)

काँग्रेसमध्ये गट वगैरे असतील असं मला वाटत नाही. मला जे बोलायचं होतं ते मी पत्रकार परिषदेत सविस्तर मुद्दे घेऊन बोललो. मी माझी भूमिका पुराव्यानिशी मांडली आहे त्यामुळे मला आता काही बोलायचं नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या माणसावर ही वेळ येते तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा सल्लाच तांबेंनी दिला.

तर, साहेबांची माझ्याबरोबर तशी काही चर्चा नाही साहेब जेव्हा व्यक्त होतात तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं मात्र यावरती मी काही बोलू शकत नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी राजीनाम्याच्या प्रश्नांवर बोलण टाळलं.

First published:

Tags: अशोक चव्हाण