मुख्यमंत्री काँग्रेसच्या आमदारांना फोन करतात, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री काँग्रेसच्या आमदारांना फोन करतात, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणजे देवाचा फोन आला असं काहींना वाटतं असंही अशोक चव्हाण म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 07 जून: काँग्रेस आमदारांना सीएम फडवणीस फोन करतात आणि पक्षात येण्यासाठी संपर्क करतात असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विचारलं असता देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या आमदारांना पक्षात घेण्यासाठी फोन करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांकडून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणजे देवाचा फोन आला असं काहींना वाटतं असंही अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान, मी काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहे. कोणीही पक्ष सोडून जाणार नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी याआधी दिली होती. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील आमदार पक्ष बदलतील अशी शक्यता आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती. काँग्रेसचा कुठलाही आमदार पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

काँग्रेस पक्षातून बाहेर जातील यात तथ्य नाही. मी अनेक आमदारांशी संपर्क केला आहे, त्यांच्याशी बोलणं झालं आहे त्यामुळे काळजीचं कारण नाही असंही ते म्हणाले होते. पण, भाजपकडून अनेक आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आमदार पक्ष सोडून जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं होतं. तर आता मुख्यमंत्री आमदारांना फोन करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : तयारी विधानसभेची.. मंत्रिमंडळात खांदेपालट, संसदीय कार्यमंत्रिपदी विनोद तावडे

काँग्रेसच्या बैठकीत स्वबळाचा नारा

लोकसभा निवडणुकींनंतर आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये आज काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. आघाडी झाली तरी राष्ट्रवादीच्या मतदारसंघात काँग्रेसला मदत करत नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीबरेबर आघाडी नको असा सूर बैठकीत पाहायला मिळाला. एनसीपी ऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशी भूमिकाही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

First published: June 7, 2019, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading