काँग्रेस, 19 जानेवारी : राज्यातील 31 जिल्ह्यांमधील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. या निवडणुकीत आज मोठमोठ्या दिग्गजांना झटका बसताना दिसतोय. तर अनेक दिग्गजांना आपापल्या मतदारसंघात स्वत:चं वर्चस्व कायम ठेवण्यात यशही मिळताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना यश आलंय. तर दुसरीकडे नांदेडमध्ये काहीसं वेगळं चित्र बघायला मिळालं आहे. अमरावतीत मंत्री यशोमती ठाकूर यांचं जसं वर्चस्व अबाधित राहिलेलं बघायला मिळालंय. तसंच नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीतही बघायला मिळतंय.
नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंतायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतींचा समावेश आहे. या तीनही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला निर्विवाद विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगाव नगरपंचायतीत काँग्रेसला तब्बल 17 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगावमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आमदार राजेश पवार यांना हा सर्वात मोठा झटका आहे.
('आबांचं स्वप्न पूर्ण केलं', रोहित पाटलांची भावनिक प्रतिक्रिया)
नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जिल्ह्यातील तीनही नगर पंचायतीत मुसंडी मारली आहे. काँग्रेसने नायगाव पाठोपाठ अर्धापूर नगरपंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता मिळवली आहे. तर माहूर नगरपंतायतीवरही काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. माहूर नगरपंतायतीत 17 पैकी 6 जागांवर यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागांवर यश मिळालं आहे.
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात भाजपचा धुव्वा उडाला आहे. माहूरला 1 आणि अर्धापूरला 2 मिळून त्यांना नांदेड जिल्ह्यात फक्त 3 जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील 51 पैकी 33 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे.
कर्जतमध्ये रोहित पवारांचं निर्विवाद वर्चस्व
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok chavan, Election, Nanded, काँग्रेस