'शेतकऱ्यांनी चारा छावण्या मागितल्या, भाजपने दिले डान्स बार आणि लावण्या'

'शेतकऱ्यांनी चारा छावण्या मागितल्या, भाजपने दिले डान्स बार आणि लावण्या'

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा औरंगाबादमध्ये पोहचल्यानंतर राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

  • Share this:

औरंगाबाद, 7 फेब्रुवारी : ' दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी चारा आणि छावण्यांची मागणी केली. पण भाजप सरकारने डान्स बार आणि लावण्या दिल्या आहेत,' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा औरंगाबादमध्ये पोहचल्यानंतर राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

'राज्यात सध्या मोठा दुष्काळ आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्रिकेट खेळत फिरत आहेत,' असं म्हणत अशोक चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 'जनसंघर्ष यात्रा संपल्या असल्या तरी भाजपला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय काँग्रेसचा संघर्ष थांबणार नाही,' असंही चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

- जगभरातील किंमतीचा परिणाम म्हणून नाही तर टॅक्स वाढवल्याने पेट्रोलचे भाव वाढले आहेत.

- महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य झाले आहे.

- बेटी बचाओ, बेटी पढाओ, असं नाही तर भाजप वालोंसे बेटी बचाओ असं झालं आहे.

- सरकारने दुष्काळ जाहीर केला मात्र मदत कुठे आहे?

- आरक्षण उच्च वर्गीयांना दिले मग मुसलमानांना आरक्षण का नाही?

- लोक आता अब की बार मोदी सरकार असं नाही तर अब की बार बस कर यार, असं म्हणत आहेत.

- सिनेमे काढून मत मिळत नसतात

VIDEO : AICC कार्यक्रमात राहूल गांधी म्हणाले...

First published: February 7, 2019, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading