'अशोक चव्हाणांसह 30 टक्के काँग्रेस नेत्यांचे सनातनशी संबंध'

'अशोक चव्हाणांसह 30 टक्के काँग्रेस नेत्यांचे सनातनशी संबंध'

केंद्रातलं सरकार निसर्ग नियमाच्या विरुद्ध चालतं : प्रकाश आंबेडकर

  • Share this:

पंढरपूर, 29 मार्च : लोकसभेचा ज्वर आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर य़ांनी काँग्रेसचे 30 टक्के उमेदवार हे सनातनशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही नाव प्रकाश आंबेडकर यांनी घेतले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी प्रचाराचा नारळ फोडताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडून अनेक आरोप होत असताना त्यावर राहुल गांधींनी मौन बाळगल्याने त्यांच्याबाबत संशय बळावला आहे. यामुळेच आम्ही काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यात घराणेशाही सुरू असून केंद्रातील मोदी सरकार संस्कृती नसलेले आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध काम करणारे सरकार असल्याचं आंबेडकर म्हणाले.

डॉन दाऊद इब्राहीमचे नाव घेतलं की बारामतीकरांना का झोंबत असं म्हणत आंबेडकरांनी शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोटामागं केवळ पाकिस्तानी नाही तर इथले राजकारणीही जबाबदार आहेत. त्यांच्या नाकर्तेपणाला जनता वैतागली असून आता सर्व सूज्ञ झाले असल्याचं आंबेडकर यांनी म्हटले.

याआधी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचे सनातनशी संबंध असल्याची चर्चा होती. एका कार्यक्रमातील त्यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने ही चर्चा झाली होती. दरम्यान, त्यावेळी सनातन संस्थेने त्याचे एक छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. तर बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी सबंध नसल्याचा खुलासा काँग्रेसने खुलासा केला होता.

SPECIAL REPORT : पार्थ पवारांचा मावळ जिंकण्याचा मनसुबा, काँग्रेसची नाराजी महागात पडणार?

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-356543" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzU2NTQz/"></iframe>

First published: March 29, 2019, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading