मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आशिष शेलार होणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष? मग चंद्रकांत पाटलांचं काय? 

आशिष शेलार होणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष? मग चंद्रकांत पाटलांचं काय? 

यापूर्वीही मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांना देण्यात येणार असल्याचीही चर्चा होती.

यापूर्वीही मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांना देण्यात येणार असल्याचीही चर्चा होती.

यापूर्वीही मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांना देण्यात येणार असल्याचीही चर्चा होती.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 8 ऑगस्ट : उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर अनेक बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपकडून 10 ते 12 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शिंदे गटाकडून 6 ते 7 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यानंतर आशिष शेलार यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी चिन्ह आहेत. आशिष शेलार यांना संघटनेची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका आणि 2024 निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मोठी  जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. यापूर्वीही मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांना देण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. त्यात चंद्रकांत पाटील जर मंत्रिमंडळात जाणार असतील तर प्रदेशाध्यक्षपद आशिष शेलार यांना दिली जाऊ शकते. गेल्या महिन्याभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. अखेरीस नुकतीच दिल्लीवारी करून परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप आणि शिंदे गटातील पहिल्या फळीतले नेते शपथ घेणार आहे. त्यामुळे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे सुद्धा तातडीने मुंबईला रवाना झाले आहे.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Mumbai

पुढील बातम्या