मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BJP Ashish Shelar : PFI आणि शिवसेनेचे काही कनेक्शन आहे का? संशय बळावतोय, आशिष शेलारांच्या वक्तव्याने तर्कवितर्क

BJP Ashish Shelar : PFI आणि शिवसेनेचे काही कनेक्शन आहे का? संशय बळावतोय, आशिष शेलारांच्या वक्तव्याने तर्कवितर्क

शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर टीका केली होती. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (bjp ashish shelar)

शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर टीका केली होती. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (bjp ashish shelar)

शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर टीका केली होती. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (bjp ashish shelar)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 29 सप्टेंबर : शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर टीका केली होती. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. याचबरोबर महाविकास आघाडीतील नेत्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले कि, शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर केली होती. यावर शेलार म्हणाले कि, पेंगविन सेनेची उंची, उडी आणि आवाज किती त्याप्रमाणे लिहिलेलं बरं असतं. त्यांनी थेट आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. यामुळे शिवसेनेकडून पलटवार होणार का हे औत्सुक्याचे आहे.

हे ही वाचा : '...अन् ती एक गोष्ट केली की शरद पवार पुन्हा सत्तेत येतात', सुप्रिया सुळेंचा दावा

याचबरोबर सुप्रीया सुळे यांच्या बारामती मतदार संघात भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. दरम्यान निर्मला सितारामन यांनी दौरा केला आहे. यावर खासदार सुप्रीया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. याला पलटवार करण्यासाठी आशिष शेलार म्हणाले कि, सुप्रीय सुळे ह्या दिवसा स्वप्न बघत आहेत त्यांना लखलाभ लाभो. बारामती मतदार संघात 2024 ला भाजप आपली कामगिरी करून दाखवेल असेही ते म्हणाले.

याचबरोबर त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर ही निशाणा साधला. अशोक चव्हाण आमच्या विषयी काढत असतील तर आम्हीही त्याच्या क्लिप्स काढू असे शेलार म्हणाले. तसचे विजय वडेट्टीवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. बुलेट ट्रेन ला विरोध करणारे सोन्याच्या गाड्या घ्यायला लागले काय त्याच गाडीत कोणते मंत्री मधुचंद्र करू पाहत होते. तर छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य निंदाजनक आहे, नवरात्रीत असं वक्तव्य येणं यानंतर भुजबळ राष्ट्रवादीत असतातच कसे आणि पेंगविन सेनेकडून एकही आंदोलन होत नाही. असे ते म्हणाले.

हे ही वाचा : युतीच्या काळात सीएम शिंदे आमच्यासोबत सरकार स्थापन करणार होते अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

संघावर बंदी घाला असे बोललेल्या वक्तव्यावर शेलार म्हणाले कि, असं वक्तव्य करणाऱ्यांना बौध्दिक रोग जडला आहे. मुंबईत पेंगविन सेना पीएफआयवरून निषेध करत नाही, सेनेच्या पीएफआय संघटनासोबत भेटी झाल्या होत्या का असा संशय बळावत असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी आपला वाढदिवस जनतेची सेवा यासाठी समर्पित केलाय. या पंधरवड्यात विविध कॅम्प, कार्यक्रम करत आहोत प्रतिमा, पुतळे म्हणजे मुंबईची शान आज 100 पुतळ्यांची साफसफाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

First published:

Tags: Aaditya Thackeray, Ashish shelar, BJP, Shiv Sena (Political Party)