मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाविका विना आषाढी एकदशी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, पंढरीत शुकशूकाट

भाविका विना आषाढी एकदशी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, पंढरीत शुकशूकाट

Ashadhi Ekadashi 2021:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा येथील विठ्ठल भक्त केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला मिळाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Vichare

सोलापूर, 20 जुलै: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर‌ आज प्रतिकात्मक पध्दतीने आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2021) सोहळा साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा येथील विठ्ठल भक्त केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला मिळाला.आषाढी एकादशी ‌असली तरी पंढरीत मात्र शुकशूकाट आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरातील वीणेकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई यांना ठाकरे दाम्पत्यासमवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते विठ्ठल मंदिरात गेल्या वीस वर्षापासून विणेकरी म्हणून सेवा करत आहेत.

महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह रश्मी ठाकरे तसेच वारकरी प्रतिनिधींचा मान मिळालेल्या कोलते दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Tourism and Environment Minister Aditya Thackeray) आदी उपस्थित होते.

पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा केली.

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी विठ्ठल -रखुमाईच्या भक्तांसाठी आजच्या या दिवशी झेंडू आणि ऑरकेट, गुलझडी, गुलाब ,पिंक डीजे, कामिनी फुलांनी पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केली आहे.

विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक मुलांच्या माळांची सजावट केली आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांच्याकडून ही मंदिर सजावट करण्यात आली आहे. हीआकर्षक फुलांची सजावट विठ्ठल-रखुमाईच्या जगभरातील भाविकांसाठी आपल्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे.

First published:

Tags: Pandharpur, Solapur, Uddhav thackeray