बेळगावात असादुद्दीन ओवैसी यांनी बांधला भगवा फेटा

बेळगावात असादुद्दीन ओवैसी यांनी बांधला भगवा फेटा

MIM या पक्षाचे खासदार आणि नेते असादुद्दीन ओवैसी यांनी बेळगावमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत भगवा फेटा घालून भाषण केलं.

  • Share this:

बेळगाव, 08 मे : राजकारणामध्ये मतदान मिळवण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही आणि असाच एक प्रत्यय बेळगाव मध्ये आला. MIM या पक्षाचे खासदार आणि नेते असादुद्दीन ओवैसी यांनी बेळगावमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत भगवा फेटा घालून भाषण केलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एमआयएम या पक्षाने जेडीएस सोबत युती केली आहे आणि जेडीएसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ओवैसी बेळगावमध्ये आले होते.

कायम हिंदुत्व आणि भगवा दहशतवाद असा शब्दप्रयोग करणाऱ्या खासदार ओवैसी यांनी भाषण करताना चक्क भगवा फेटा परिधान केला. हे पाहून अनेक मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. बेळगावमध्ये हिंदू मतदान जास्त आहे त्यामुळे ती मत मिळवण्यासाठी ओवेसी यांनी हा फेटा परिधान केला का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, तर आपल्या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर ओवैसी यांनी जोरदार टीकाही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2018 04:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading