तिहेरी तलाकबद्दल कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत, पण...-ओवेसी

तिहेरी तलाकबद्दल कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत, पण...-ओवेसी

"जर उद्या एखाद्या मुस्लिम महिलेनं शरियत कायद्यानुसार मला घटस्फोटाचा निर्णय घ्यायचा ठरला तर..."

  • Share this:

22 आॅगस्ट : तिहेरी तलाकबद्दल  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. पण जर उद्या एखाद्या मुस्लिम महिलेनं शरियत कायद्यानुसार मला घटस्फोटाचा निर्णय घ्यायचा ठरला तर काय करणार ? असा सवाल एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केलाय.

सुप्रीम कोर्टाच्या पाच वकिलांच्या खंडपिठाने ट्रिपल तलाकला सहा महिन्यांसाठी बंदी घालण्याचा ऐतिहासिक निकाल दिलाय. या निकालबद्दल मुस्लिम समाजामध्ये समिश्र प्रतिक्रिया आहे. काही जणांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काही जणांनी नाराजी व्यक्त केलीये. एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनीही समिश्र प्रतिक्रिया दिली.  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. पण जर उद्या एखाद्या मुस्लिम महिलेनं शरियत कायद्यानुसार मला घटस्फोटाचा निर्णय घ्यायचा ठरला तर काय करणार ? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.

तसंच आमच्याकडे जो सर्व्हे आहे त्या सर्व्हेनुसार ट्रिपल तलाकच्या अशा घटना कमी घडल्या आहेत. मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाच्या सदस्याने देशभरात कानाकोपऱ्यात फिरून ट्रिपल तलाक देऊ नका असा प्रचार केलाय. आज सुप्रीम कोर्टाने दिलेला 477 पानाचा निकाल आहे तो संपूर्ण वाचूनच पुढेची भूमिका ठरवणार अशी माहितीही ओवेसींनी दिली.

First published: August 22, 2017, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading