News18 Lokmat

संबंध चांगले ठेवायचे असतील कुलभूषण यांना परत पाठवा,ओवेसींचा पाकला इशारा

"कुलभूषणला भारतात परत आणण्याची जबाबदारी ही नरेंद्र मोदींची आहे, काहीही करून कुलभूषण यांना परत आणावं"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2017 12:12 PM IST

संबंध चांगले ठेवायचे असतील कुलभूषण यांना परत पाठवा,ओवेसींचा पाकला इशारा

13 एप्रिल : पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर कुलभूषणला सही सलामत परत करावं असा इशाराच  एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी दिलाय.  तसंच कुलभूषणला भारतात परत आणण्याची जबाबदारी ही नरेंद्र मोदींची आहे, काहीही करून कुलभूषण यांना परत आणावं अशी मागणी  ओवेसी यांनी केलंय.

असादुद्दीन ओवेसी हे लातुरात महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी लातुरात आले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर आगपाखड तर केलीच पण काहीही करून कुलभूषणला भारतात सही सलामत आणावं अशी मागणी केलीये.

जेव्हा अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हा त्याला अखेरपर्यंत आपली बाजू मांडण्याची भारताने संधी दिली होती. त्यामुळे अजमल कसाबने सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतरच कसाबला फासावर लटकवण्यात आलं होतं. पण पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधव यांच्याविरोधात कोणतेही पुरावे हाती न लागता फाशीची शिक्षा सुनावलीये.  पाकिस्ताननं देखील भारताशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर कुलभूषणला सही सलामत परत करावं असा इशारा ओवेसी यांनी दिलाय.

तसंच कुलभूषणला भारतात परत आणण्याची जबाबदारी ही नरेंद्र मोदींची आहे. जर त्यांना ताकदीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा प्रयोग करावा लागला तर करावा पण कुलभूषणला परत आणावं असंही ओवेसी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...