अकोला, 25 मे : अकोल्यात असदगड नावाचा प्राचीन किल्ला (Asadgad Fort) आहे. हा किल्ला प्राचीन काळातील असून अकोला जिल्ह्याचे वैभव (Akola's Majesty) आहे. तसेच अकोला जिल्ह्याची ओळख म्हणून हा किल्ला (Akola's Indentity) ओळखला जातो. मात्र, आता या किल्ल्याची दशा काहीशी विचित्र झाली आहे.
16 व्या शतकांत झालंय बांधकाम -
अकोल्याचं वैभव असलेला असदगड या किल्ल्याचा काहीसा भागच आपल्याला पाहायला मिळतो. असदगड या किल्ल्याला आझाद पार्क म्हणूनही ओळखले जाते. असदगड हा किल्ला 16व्या शतकातील आहे. शहरातील असदगड या किल्ल्याला लागून मोरणा नदी वाहते. अकोल्याचे आराध्य दैवत मानले जाणारे राज राजेश्वर हे मंदिर या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.
राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित मात्र...
अकोला शहरातील असदगड किल्ला हा अकोला जिल्ह्यातील प्रमुख ओळख आहे. शहरातील असदगड किल्ला हा प्राचीन आहे. राजेशाहीत या किल्ल्याची बांधणी केली होती, अशी इतिहासात नोंद आहे. त्यामुळेच तो राष्ट्रीय वारसा (National Heritage) म्हणून घोषित केला आहे. या घोषणेमुळेच त्याचे संवर्धन, सौंदर्यीकरण ही भारतीय पुरातत्व विभागाची जबाबदारी आहे. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाने अजूनपर्यंत पुढाकार न घेतल्याने या किल्ल्याची आता दुरावास्ता झाली आहे.
अकोल्याची ओळख आणि अकोल्याचे वैभव असणाऱ्या असदगड किल्ल्याकडे प्रशासनाने जर लक्ष दिलं तर अकोल्याचं वैभव आणि ओळख टिकून राहील. तसेच असदगड किल्ला हा अकोला जिल्ह्यातील प्रमुख ओळख म्हणून कायमस्वरूपी राहील.
असदगड हा किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ याने असदखॉंच्या देखरेखीखाली 1698मध्ये बांधून पूर्ण केला. हा खरे तर किल्ला नसून संरक्षक तटबंदीचा बुरूज आहे. या तटबंदीस कधीकाळी असद बुरूज, फतेह किवा पंच बुरूज, अगरवेस बुरूज असे एकूण तीन बुरूज होते, त्यांतील पहिले दोनच शिल्लक आहेत. असद बुरूजालाच असदगड म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा - भारतीय लष्करातचं झळझळीत यश! सूर्यकिरणांनी चमकणाऱ्या या पर्वतावर चढाई प्रथमच केली चढाई, पाहा PHOTOS
तटबंदीपूर्वी दहीहंडा वेस, अगर वेस, गंज वेस आणि शिवाजी किंवा बाळापूर वेस असे चार दरवाजे होते. त्यांपैकी पहिले दोन दरवाजे शिल्लक आहेत. यातील अगर वेस ही गोविंद आप्पाजी याने 1843मध्ये बांधली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.