मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अनिल परबांच्या अडचणीत वाढ? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रत्नागिरीतील रिसॉर्टसंदर्भात चौकशी सुरू

अनिल परबांच्या अडचणीत वाढ? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रत्नागिरीतील रिसॉर्टसंदर्भात चौकशी सुरू

जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि दापोलीचे प्रांत याच्या मार्फत ही चौकशी सुरू झाली असून अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
शिवाजी गोरे, रत्नागिरी, 02 जून: जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि दापोलीचे प्रांत याच्या मार्फत ही चौकशी सुरू झाली असून अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब याच्या साई रिसोर्ट बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी  कार्यालयाने चौकशी समिती नेमून त्या संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दापोली तालुक्यातील मुरुड याठिकाणी गट क्रमांक 446 मध्ये असणाऱ्या साई रिसॉर्ट एनेक्सच्या बांधकामाविरोधात लेखील तक्रार केली होती. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय सीआरझेड उल्लंघन, फसवणूक, दस्तऐवजात खाडाखोड, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष  इत्यादी तक्रारी नमुद करत त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मंत्री अनिल परब यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. हे वाचा-आता बोला! औरंगाबादेत ICU मधील मॉनिटरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह या संदर्भात कारवाई करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार, रत्नागिरी येथील दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्टचे बांधकाम हे बिनशेती परवानगी तसंच उल्लंघन करून बेकायदेशीर बांधकाम केले गेले. या प्रकरणात फसवणुकीमध्ये सहभागी असलेल्याबद्दल फौजदारी कारवाई करण्याबाबतचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार,  जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले. हे वाचा-पुण्यात लॉकडाऊनच्या नियामवलीत बदल, सुरू झालेली 'ही' दुकानं राहणार बंद! त्या तक्रारीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी, दापोली यांच्याकडून चौकशी अहवाल मागवण्यात आलेला आहे. चौकशी अहवालावरुन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे डॉ.किरीट सोमय्या यांना कळवले आहे. तत्पूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती. सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे देखील रिसॉर्ट प्रकरणाची तक्रार केली होती. शिवाय त्यांनी ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय आणि आता रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर चौकशी सुरू झाली आहे.
First published:

Tags: Anil parab, Maharashtra, Mumbai

पुढील बातम्या