निर्भयानंतर कोपर्डीच्या भगिनीला न्याय द्या, छत्रपती संभाजीराजेंची मागणी

निर्भयानंतर कोपर्डीच्या भगिनीला न्याय द्या, छत्रपती संभाजीराजेंची मागणी

देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी हि घटना आहे. निर्भयला न्याय मिळाला, आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी ही घटना आहे. पण आता निर्भयला न्याय मिळाला, त्यामुळे कोपर्डीच्या भगिनीलाही न्याय मिळावा अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. तब्बल 7 वर्ष 3 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपींना फाशी देण्यात आली. यानंतर आता अनेक गुन्ह्यांमध्ये महिलांना न्याय मिळावा अशी आशा पल्लवीत होत आहे.

देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी हि घटना आहे. निर्भयला न्याय मिळाला, आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची. कोपर्डीचे बलात्कारी नराधमसुद्धा लवकरात लवकर फासावर लटकले पाहिजेत. त्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहेत. असं ट्वीट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. निर्भयाच्या चारही नराधमांना जल्लाद पवननं सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी फासावर लटकवलं. 2012 रोजी दिल्लीतील निर्भयावर क्रूरपणे बलात्कार करून हत्या करणाऱ्या पापी नराधमांचा अखेर अंत झाला आणि निर्भयाला उशिरा का होईना न्यायव्यवस्थेनं न्याय दिला.

हे वाचा -  1 ते 8वीपर्यंत परीक्षा रद्द, नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर

दरम्यान, हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केला. तेलंगणा पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण देशभरात स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतरसुद्धा कोपर्डीतील 'त्या' आरोपींना फाशी कधी? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

कोपर्डीची घटना घडून साडेतीन वर्षे झाल्यानंतरही आरोपी जेलमध्ये आहेत. जिल्हा कोर्टाने नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हाय कोर्टात आता सुनावणी सुरु आहे. हैदराबादमधील निर्भयाच्या आरोपींचे एन्काऊंटर झाल्यानंतर जनतेत आनंद होता. ही घटना पाहता कोपर्डी प्रकरणाची सुनावणी त्वरित पूर्ण करून आरोपींना फाशी दिली जावी, अशी मागणी समोर येत आहे.

मद्यधुंद नराधमांनी असे तोडले होते 'कोपर्डी'च्या'निर्भया'चे लचके!

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती. दिल्लीतील निर्भयाप्रकरणाप्रमाणेच कोपर्डीतील घटनाही अत्यंत निर्घृण होती. अल्पवयीन मुलीवर केवळ बलात्कार करून नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली होती. तिच्या तोंडात बोळा कोंबला होता, तिचे केस उपटले होते. तिचे ओठ तोडले होते. दोन्ही हात खांद्यापासून निखळले होते, शेवटी डोक्यावर जबरदस्त वार करून गळा आवळून निर्भयाला संपवण्‍यात आले.

हे वाचा - महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

न्यायदान प्रक्रियेत होणारा उशीर आणि प्रक्रियेतील त्रुटींमुळे नराधम आरोपी शिक्षेपासून दूर राहतात. त्यामुळे समाजात असंतोष निर्माण होत असतो. दुसरीकडे कोपर्डी सारख्या तेव्हढ्याच गंभीर प्रकरणातील आरोपी कायद्याचा आधार घेत आरामात आहेत. न्यायदानाची ही प्रक्रिया बदलली पाहिजे, अशी मागणी भोर यांनी करत कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फासापर्यंत पोहोचवलं पाहिजे.

First published: March 20, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या