नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : लोकसभेत काश्मीरच्या स्वायत्त दर्जाबाबतच्या कलम 370 हटवण्यावर गंभीरपणे चर्चा सुरू होती. महाराष्ट्रातल्या खासदार नवनीत राणा या विधेयकावर बोलायला उभ्या राहिल्या. विरोधी पक्षांमध्ये बसूनही नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं अभिनंदन करत या विधेयकाला पाठिंबा दिला. नवनीत राणा बोलत असताना विरोधी बाकांवरच्या कुणीतरी त्यांना तेलुगूतून काहीतरी बोललं. त्यावर त्यांना तेलुगूतच उत्तर देत नवनीत यांनी सुनावलं, मी विरोधी पक्षांमध्ये बसत असले, तरी मी अपक्ष म्हणून लढले आहे. मला बोलायचंय असं सांगितलं. 56 इंच छाती असा उल्लेख करत नवनीत राणा असं काही बोलल्या की अमित शहांनाही हसू आलं.