मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नापास झाले म्हणून फडणवीस दिवसा स्वप्न पाहताय, पटोलेंचा सणसणीत टोला

नापास झाले म्हणून फडणवीस दिवसा स्वप्न पाहताय, पटोलेंचा सणसणीत टोला

इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात.

इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात.

'देवेंद्र फडणवीस हे काही परीक्षक नाहीत. ते परीक्षक नसल्यामुळे कोण पास आणि नापास हे ठरवणे त्यांच्या हातात नाही'

महाड, 16 ऑक्टोबर : भाजपचे (bjp) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काँग्रेस (congress) नापास झाली अशी टीका केली होती. पण, 'फडणवीस हे स्वतः नापास झालेले आहे म्हणून ते दिवसा स्वप्न पाहत आहेत. कोण पास कोण नापास हे जनताच ठरवेल' असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी लगावला.

महाडमध्ये माजी आमदार लोकनेते स्व. माणिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाड नगर परिषदेचा  छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रायगड पालकमंत्री आदिती तटकरे,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले, खासदार सुनिल तटकरे,  आ.भरत गोगावले, महाड नगराध्यक्ष स्नेहल जगताप, शोभाताई सावंत, महेंद्र घरत आदी उपस्थित आहेत. यावेळी माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावला.

धक्कादायक! कोरोनामुळे 6 लाख लोकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्षांवर दाखल होणार खटला

'देवेंद्र फडणवीस हे काही परीक्षक नाहीत. ते परीक्षक नसल्यामुळे कोण पास आणि नापास हे ठरवणे त्यांच्या हातात नाही. कोण पास को वरपास हे जनता ठरवत असते. देवेंद्र फडणवीस हे स्वतःच नापास झालेत. त्यामुळे ते दिवसा स्वप्न पहात आहेत, असा टोला नाना पटोले यांनी  फडणवीस यांना लगावला. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादी नापास शिवसेना वरपास अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती.

तसंच, 'केंद्रामध्ये भाजपचे सरकार आल्यामुळे ते दुश्मनी काढत आहे. गृहखाते हे मुख्यमंत्र्यांकडे शक्यतो ठेवले जात नाही. पण, भाजप हे सत्तेत आल्यानंतर फडणवीसांनी आपल्याकडे गृहखाते घेतले. त्यावेळी त्यांनी गृहमंत्री खाते किती ताकदीचे आहे हे दाखवून देईल असं सांगितलं होतं, त्यानंतर त्यांनी ब्लॅकमेलिंग करून फायली तयार केल्या हे सर्वांनी पाहिलं आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

अरे वा! आता शेतीशिवाय कॉफीचं उत्पन्न; जाणून घ्या या नव्या तंत्राविषयी...

तर, 'महाडमधील पुराची समस्या कायम स्वरूपी मिटवण्यासाठी एक कार्यक्रम तयार करणे आवश्यक आहे. पूर दरवर्षी येतो यंदा तो जास्त आला. यामागची कारणं काय, दोष काय आहेत त्यावर काय उपाय करता येईल याचा प्रस्ताव लवकरच तयार केला जाईल. महाडमधील बहुतांश पुरग्रस्ताना मदत वाटप झालं आहे उर्वरित लवकरच पूर्ण होईल' असं आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं.

'सरसकट मदत वाटपाच्या मागणीबाबत त्यांनी निकष पाळले पाहिजेत असं उत्तर दिलं. केंद्राकडून देखील मदतीची अपेक्षा होती परंतु त्यांचे पथक 2 महिन्यांनी पाहणीसाठी आलं आता काय मदत करतात ते पाहू' असंही थोरात म्हणाले.

First published:

Tags: Nana Patole