मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'वडिलांचं माझ्यावर प्रेम नव्हतं' मुलाने केला जन्मदात्याचा खून, भासवली आत्महत्या पण...

'वडिलांचं माझ्यावर प्रेम नव्हतं' मुलाने केला जन्मदात्याचा खून, भासवली आत्महत्या पण...

 बापाचा (father murder) खून करून मुलाने आत्महत्येचा (Suicide) बनाव केला. पण, त्याचा हा बनाव जास्त काळ टिकू शकला नाही.

बीड, 08 नोव्हेंबर : बाप आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात उघड झाली आहे. बापाचा (father murder) खून करून मुलाने आत्महत्येचा (Suicide) बनाव केला. पण, त्याचा हा बनाव जास्त काळ टिकू शकला नाही. पोलिसांच्या तपासात मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील परळीमध्ये ही घटना घडली आहे. परळी शहरात राहणाऱ्या अजय शांतीलाल लुंकड या प्लॉट व्यावसायिकाने 2 दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं होतं. अजय लुंकड यांनी  आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यांच्या मुलगा सिद्धार्थ लुकड याने सांगितलं होतं.

विराट-शास्त्री युगाचा अंत, गुरू-शिष्याने इतिहास घडवला पण शेवट गोड नाही

पण, व्यावसायिक असलेले अजय लुंकड यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी शेजारी, मित्र आणि दुकानदारांची चौकशी केली. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या मुलगा सिद्धार्थची चौकशी केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आपणच वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली.

वडिलांचं माझ्यावर प्रेम नव्हतं, ते माझे काळजी घेत नव्हते  म्हणून हत्या केल्याची कबुली आरोपी सिद्धार्थ लुंकड याने दिली.

LPG Cylinder Price: आता सिलिंडरसाठी मोजावे लागतील तब्बल 1000 रुपये! का? वाचा

आरोपी मुलाचं संशयास्पद वर्तन आणि शवविच्छेदनाच्या अहवालाच्या जोरावर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. हत्येच्या सात दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला गजाआड केलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे  असं सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Beed, Beed news