Home /News /maharashtra /

वाढत्या महागाईचा परिणाम, घटस्फोटित महिलेच्या पोटगीत दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ

वाढत्या महागाईचा परिणाम, घटस्फोटित महिलेच्या पोटगीत दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ

सीमा या दरमहिन्याला 7 हजार रुपये कमावतात आणि त्यांची वडिलोपार्जित शेती आहे.

    नागपूर, १ मार्च : वाढत्या महागाईचा परिणाम दैंनदिन जीवनात होत असतो. सध्या जगभरात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणात घटस्फोटित महिलेला मंजूर केलेल्या पोटगीत वाढत्या महागाईनुसार दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने घटस्फोट घेणाऱ्या पतीला दिले आहे. रुपेश आणि सीमा (नावं बदललेली आहेत) यांनी 12 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. त्यांना 11 वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर दोघांमधील मतभेद वाढल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 25 एप्रिल 2014 रोजी अमरावतीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला. मुलीचा ताबा सीमा यांना मिळाला. त्यावेळी न्यायालयाकडून सीमा यांना 5 हजार रुपये पोटगी आणि मुलीसाठी 3 हजार रुपये मंजूर करण्यात आले. मात्र महागाई वाढत असल्याने इतक्या पैशात घर चालविणे शक्य होत नसल्यामुळे सीमा यांनी पोटगी वाढवून देण्याची विनंती कौटुंबिक न्यायालयात केली. मात्र कौटुंबिक न्य़ायालयाने ही विनंती फेटाळली. त्यानंतर सीमाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड़पीठात यासंदर्भात याचिका दाखल केली. महागाई वाढत असल्याने घरखर्च चालविणे अवघड जात असल्याचे सीमा यांनी आपल्या याचिकेत सांगितले. त्यामुळे पोटगीची रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. सीमा या दरमहिन्याला 7 हजार रुपये कमावतात आणि त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यामुळे त्यांच्या पोटगीत वाढ करण्याची गरज नसल्याचे रुपेश यांनी सांगितले. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महागाईमुळे सीमाला दरवर्षी पोटगीच्या रकमेत 10 टक्के वाढ करण्याचे आदेश दिले. हे वाचा - क्रिकेटपटूनं 19 वर्षीय तरुणीशी केलं लग्न, नातेवाईकाला समारंभातच झाली मारहाण

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या