अहमदनगर, 23 ऑगस्ट: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केल्यानं तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. यामुळे करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानुर तसंच बीड जिल्ह्यातील शिरूर पर्यंत दमदार पावसाची सुरुवात झाली.