मराठवाड्यात 30 तारखेनंतर कृत्रिम पाऊस, बबनराव लोणीकरांची माहिती

मराठवाड्यात 30 तारखेनंतर कृत्रिम पाऊस, बबनराव लोणीकरांची माहिती

मराठवाड्यातील अत्यल्प पावसाने सरकारची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या परवानगी आणि प्रक्रिया 30 जुलैपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडला जाईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

  • Share this:

जालना, 14 जुलै- मराठवाड्यातील अत्यल्प पावसाने सरकारची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या परवानगी आणि प्रक्रिया 30 जुलैपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडला जाईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. या संबंधीची सर्व अत्याधुनिक यंत्रणा उभी करून कृत्रिम पाऊस पाडण्याच प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

मराठवाडा वॉटर ग्रिडच्या कामाची बबणराव लोणीकर यांनी रविवारी पाहणी केली. जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील शंभर गावांना एक महिन्यांत मिळणार फिल्टरचे पाणी मिळणार आहे. तसेच मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी लवकरच मराठवाडा वॉटर ग्रिडचे काम सुरू होणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांनी सांगितले. इस्रायल आणि गुजरातच्या धर्तीवर राज्यातील पहिला वॉटर ग्रिडचा प्रोजेक्ट हा जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील 176 गावात संयुक्त होत आहे. प्रोजेक्टची हायड्रोलिक टेस्ट लोणीकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सर्व कामकाजाची पाहणी करत एक महिन्याच्या आता तालुक्यातील शंभर गावांमधीव प्रत्येक कुटूंबाला केवळ सात रुपयांत एक हजार लिटर पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातत्याने मराठवाडा दुष्काळात होरपळून निघत आहे. त्यामुळे पुढील पिढीला हा दुष्काळ पाहण्याची वेळ येऊ नये म्हणून राज्य सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून यासाठी इस्रायल, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या देशांची मदत मिळणार आहे. लवकरच याची निविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. पाण्याचा पिण्यासह, शेती आणि उद्योग धंद्यालाही मिळणार आहे.

उदयनराजेंचा 'प्यार का तोहफा तेरा' गाण्यावरील टिकटॉक VIDEO VIRAL

First published: July 14, 2019, 8:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading