कोल्हापूर आणि सांगली पूरग्रस्तांसाठी मदत करताना जाहिरातबाजी, धान्य पॅकेटवर मुख्यमंत्र्याचा फोटो

कोल्हापूर आणि सांगली पूरग्रस्तांसाठी मदत करताना जाहिरातबाजी, धान्य पॅकेटवर मुख्यमंत्र्याचा फोटो

धान्य आणि साहित्याच्या पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 10 ऑगस्ट- कोल्हापूर आणि सांगली परिसरात पुरानं थैमान घातलं आहे. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मदत मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. पूरग्रस्तांसाठी मदत करताना सरकार आपली पोळी भाजून घेत असताना दिसत आहे. पूरग्रस्तांसाठी मदत करतानाधान्य आणि साहित्याच्या पॅकेटवर भाजपने आपली जाहिरातबाजी केली आहे. धान्य आणि साहित्याच्या पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो आहेत.

पूरग्रस्तांची सरकारकडून थट्टा..ऑनलाईन मिळणार मदत

दरम्यान, राज्य सरकारने आणखी एक अजब अध्यादेश काढून पूरग्रस्तांची थट्टा केली आहे. पूरग्रस्त नागरिकांना त्यांच्या बँक खात्यात मदत करावी, असा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे आधीच रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला असताना लोक पैसे काढण्यासाठी बँकांपर्यंत कसे पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, या अध्यादेशाबाबत सरकारने सारवासारव केली आहे. आम्ही सगळी रक्कम खात्यात न देता काही रक्कम रोख स्वरूपात देणार आहोत, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे याबाबत सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे, हे प्रत्यक्ष मदतीनंतरच लक्षात येईल.

..तरच मिळणार मदत!

पुराचं पाणी दोन दिवस घरात असेल तरच मिळणार मदत, असा अजब अध्यादेश राज्य सरकारने याआधी काढला होता. सरकारच्या या निर्णयानंतर पूरग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आणि निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. पुराच्या पाण्याने थैमान घातल्याने सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच सरकारने दोन दिवस परिसरात किंवा घरात पुराचं पाणी साचलेलं असल्यावरच 10 किलो गहू आणि तांदूळ देणार असल्याचा अध्यादेश काढल्याने पूरग्रस्तांमध्ये संताप निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा ऑनलाईन मदतीचा अध्यादेश काढल्याने सरकारविरोधात रोष निर्माण होत आहे.

घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

First published: August 10, 2019, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading