• होम
  • व्हिडिओ
  • #बाप्पामोरया ! अंगारकी चतुर्थीला अशी सजली गणपती मंदिरं
  • #बाप्पामोरया ! अंगारकी चतुर्थीला अशी सजली गणपती मंदिरं

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2018 01:15 PM IST | Updated On: Jul 31, 2018 02:00 PM IST

    आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. राज्यभरातील गणेश मंदिरांमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलीये. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात रात्रीपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्यात. मध्यरात्री 12.15 वाजल्यापासून सिद्धीविनायकाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणपती बाप्पाची विशेष पूजा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आलीये. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातूर मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीये. पुण्यातही श्रीमंत हलवाई दगडूशेठच्या गणपती मंदिरात गणेश भक्तांनी अंगारकी निमित्त दर्शनासाठी गर्दी केली. आज पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची रिघ लागलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading