29 जून : उत्तराखंड मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या शशिकांत पवार यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी बेटावदमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित, पालकमंत्री सुरेश शेट्टी आणि परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. तर जळगावचे शहीद सैनिक गणेश अहिरराव यांच्या पार्थिवाची डीएनए टेस्ट अद्याप बाकी आहे. या टेस्टनंतरच त्यांचं पार्थिव कुटुंबियांकडे सोपवलं जाईल. मृत्यूला पाच दिवस उलटूनही त्यांचं पार्थिव न मिळाल्याने अहिरराव कुटुंबीय चिंतेत आहे. मुंबईतील शहीद झालेले विंग कमांडर डॅर्लि कॅस्टिलिनो याचं पार्थिव आज मुंबईत आणण्यात आलंय. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार कऱण्यात येतील.