पावसामुळे राज्यातील धरणं भरू लागली...

पावसामुळे राज्यातील धरणं भरू लागली...

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये 61.97% उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

  • Share this:

21 ऑगस्ट: तब्बल तीन आठवड्यांपासून राज्यावर रुसलेला पाऊस राज्यभर पुन्हा राज्यभर बरसतो आहे.त्यामुळे राज्यातील नदी नाले धरणं भरण्यास सुरूवात झाली आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये 61.97% उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

नाशिकमध्ये पहाटेपासूनच धरणक्षेत्रात पाऊस पडल्यानं गंगापूर धरणातून सकाळी आठ वाजल्यापासून 6000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्गास सुरूवात झाली आहे. गोदावरीला पुर आला असून गोदाकाठच्या 103 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकमध्ये या पावसाळ्यात चौथ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळाची धग जाणवणाऱ्या मराठवाड्यासह राज्यात पावसाने साखर पेरणी केली आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. मराठवाड्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये आता 27.40% उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. तर कोकणातील धरणांमध्ये 89% पाणीसाठा जमा झाला आहे.  मराठवाडा वगळता राज्यातील सर्वच विभागातील धरणं अर्ध्याहून अधिक भरली आहेत.

पाऊस असाच सुरू राहिल्यास मराठवाड्यातलीही धरणं भरून शेतीच्या कामांना वेग येईल. तर विदर्भात बरसरलेल्या पावसामुळेही शेतकरी आणि नागरिक सुखावला आहे. खोळांबलेल्या धान पीकाच्या रोवणीला पुन्हा  सुरुवात झाली आहे आहेत. तर जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. येत्या  दोन दिवसात अजून  पाऊस बरसण्याची  शक्यता आहे.

मुंबई पुण्यासह राज्यभरात पाऊस बरसतो आहे. पण या धो-धो पावसामुळे आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

First published: August 21, 2017, 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading