अखेर पुणे पोलीस 'वर्दीला' जागे झाले, 'त्या' न्यायाधीशाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करणार

अखेर पुणे पोलीस 'वर्दीला' जागे झाले, 'त्या' न्यायाधीशाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करणार

.पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही हे सांगायला आधी कुणीच तयार नसताना अखेर वाढत्या दबावानंतर आज गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • Share this:

17 आॅगस्ट : पुणे पोलिसांच्या वाहतूक कर्मचाऱ्याला न्यायाधीशाच्या पतीने मारल्याच्या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतर आता पोलिसांना जाग आलीये. पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही हे सांगायला आधी कुणीच तयार नसताना अखेर वाढत्या दबावानंतर आज गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बुधवारी कर्वे रोडच्या नळस्टॉपवर सिग्नल तोडून दुचाकीवर पुढे निघालेल्या वडील आणि मुलीला तिथेच कार्यरत असलेल्या वाहतूक विभागाचे कर्मचारी रवी इंगळे यांनी त्यांना हटकल त्यावर पुढे गेलेले  श्याम भदाणे हे पुन्हा चुकीच्या बाजूने मागे आले. दरम्यान, त्यांनी आणि त्यांच्या मुलीने इंगळे यांच्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली.

इंगळे यांनी त्यांच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली दरम्यान भदाणे आणि इंगळे यांच्यात बाचाबाची झाली आणि भदाणे यांनी थेट दुचाकी इंगळे यांच्या पायावर घातली. भडकलेल्या इंगळे यांनी भदाणे यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान भदाणे यांच्या मुलीने पोलीस इंगळे यांच्या कानशिलात लगावली, त्यानंतर भदाणे यांनीही गाडीहून उतरून इंगळे यांना मारहाण केली.

मात्र वरिष्ठ पोलीस त्याच्या पाठीशी उभे राहाण्याऐवजी पळपुटी भूमिका घेतली होती. काल दिवसभर पोलीस ठाण्यात बसूनही वरिष्ठांनी गुन्हा दाखल करण्याबाबत ठोस भूमिका घेतली नव्हती.

अखेर माध्यमांचा दबाव वाढल्यानंतर रवींद्र इंगळे यांना मारहाण होऊन २४ तास उलटून गेल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याच वाहतूक उपायुक्तांना सांगितलंय. न्यायाधीशाचा पती असल्यानेच या प्रकरणी वरिष्ठांनी भूमिका घेतली नाही अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

पोलीस कर्मचाऱ्याबद्दल ही परिस्थिती असेल तर, कायदा सर्वांना समान या ब्रम्हवाक्यावर भरोसा कुणी आणि का ठेवायचा..

First published: August 17, 2017, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading