संडे नव्हे 'बँक डे'; एटीएमच्या बाहेरही रांगाच रांगा

संडे नव्हे 'बँक डे'; एटीएमच्या बाहेरही रांगाच रांगा

  • Share this:

BANK RUSH

13 नोव्हेंबर : देशभरात सर्वच बँकांसमोर लोकांची मोठी रांग पाहायला मिळते आहे. आज रविवार असूनही बँका सुरू आहेत. त्यामुळे आठवडाभर नोकरी करणाऱ्या अनेकांची सकाळ रांगेतच झालेली पाहायला मिळतेय. मात्र अनेक तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं आहे.

संपूर्ण आठवडाभर काम करणाऱ्या नोकरदार वर्गाची गैरसोय टाळण्यासाठी रविवारीदेखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे आठवडाभर कामात व्यस्त असणाऱ्या लोकांनी सकाळपासूनच बँकांसमोर गर्दी केली. जुन्या नोटा बदलण्यासाठी लोकांनी बँकांसमोर मोठ्या रांगा लावल्या. मात्र अनेक ठिकाणी बँकिंग यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे लोकांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागत आहे. काही ठिकाणी बँका उशीरा सुरू झाल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

बँकेसमोर असणारी मोठी रांग पाहून अनेकांनी एटीएममधून पैसे काढण्याचा विचार केला. मात्र अनेक एटीएममध्ये पैसेच नसल्याने लोकांना रिकाम्या हाताने माघारी परतावं लागतं आहे. रात्रभरात एटीएम मशिनमध्ये पैसे टाकले गेले असतील, अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र बहुतांश एटीएममध्ये पैसेच नसल्याची परिस्थिती आहे. तर अनेक एटीएम बंद आहेत. त्यामुळे लोकांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढणे शक्य होत नाही आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये काहींनी बँकेतून जुन्या नोटा बदलून घेतल्या आहेत. अनेकांना दोन हजाराच्या नव्या नोटा मिळाल्या आहेत. मात्र दुकानदारांकडे सुट्टे पैसे नसल्याने या दोन हजारांचा सामान्य माणसाला काहीच उपयोग होत नाही आहे. त्यामुळे रविवारची सकाळ सामान्य माणसासाठी मनस्तापदायक ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 13, 2016, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading