परभणी, 2 नोव्हेंबर : ट्रकच्या उजेडात नजर चुकल्याने कारने 3 तरुणांना चिरडलं आहे. पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील ही दुर्दैवी घटना आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे. गोविंद देविदास साबळे (21 वर्ष) आणि संतोष उत्तम साबळे (18 वर्ष) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. तर रमेश साबळे हा 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे.