नागपूरमध्ये मिळाले प्रेमी युगुलाचे हातात हात बांधले मृतदेह, आत्महत्या की हत्या?

नागपूरमध्ये मिळाले प्रेमी युगुलाचे हातात हात बांधले मृतदेह, आत्महत्या की हत्या?

दोन दिवसांपूर्वी या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर,09 जानेवारी : नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुटाळा तलावात एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही मृतकांची ओळख पटलेली नसून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आले होते. परिसरातील स्थानिकांकडून घटनेची माहिती अंबाझरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

धक्कादायक म्हणजे, मृतदेह बाहेर काढले त्यावेळी दोघांचे हात एकमेकांना बांधलेले होते. मृत तरुण हा 22 ते 25 वयोगटातील तर तरुणी ही 20 ते 22 वयोगटातील असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. किमान दोन दिवसांपूर्वी या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या जोडप्याने आपली ओळख लपवण्यासाठी मोबाईलचे सिम कार्ड देखील काढून फेकले आहे. तसंच मृतकांकडे कोणतेही ओळखपत्र नसल्यानं पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.​

=================================

First published: January 9, 2019, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading