पुणेकराची कमाल, तब्बल 151 वेळा केलं रक्तदान !

पुणेकराची कमाल, तब्बल 151 वेळा केलं रक्तदान !

३९ वर्ष दर तीन महिन्यांनी कुठल्याही परिस्थितीत रक्तदान करण्याची त्यांची ही चिकाटी आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे

11 डिसेंबर : हल्ली रक्ताच्या तुटवड्याच्या अनेक बातम्या येत असतात मग शिबीर लावली जातात रक्त गोळा केल जातं...जनजागृतीसाठी ही मोठे प्रयत्न होतात. मग पुन्हा स्थिती जैसे थेच होते. पण पुण्यातला एक अवलिया रक्तदान हे आपलं कर्तव्य मानून सलग ३९ वर्ष रक्तदान करतोय. त्यांनी आज १५१ व्या वेळेस रक्तदान केलंय. या बद्दलचा हा एक स्पेशल रिपोर्ट

३९ वर्ष सतत एखादं व्रत पाळणं आणि त्यात कुठलाही खंड पडू न देणं ही एक प्रकारची तपश्चर्या आहे.. सारंग यादवाडकर हे गृहस्थ गेले ३९ वर्ष रक्तदानाची तपश्चर्या करत आहेत. दर तीन महिन्यांनी एकदा रक्तदान करायचा व्रत त्यांनी १९७८ ला कॉलेजमध्ये असताना सुरू केलंय. ते आजतागायत त्यांनी पाळलंय. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आजही यादवाडकर यांनी १५१ व्या वेळेस रक्तदान केलंय.

रक्ताची कायम कमतरता असलेल्या ससून हॉस्पिटलची त्यांनी रक्तदानासाठी निवड केलंय. यादवाडकर यांच्या सारख्या दात्यांनीच अनेकांचे प्राण वाचवलेत. त्यामुळे त्यांचं दान अमूल्य आहे, असं ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर चंदनवाले यांचं म्हणणंय.

सारंग यादवाडकर हे पेशाने आर्किटेक्ट आहेत. ३९ वर्ष दर तीन महिन्यांनी कुठल्याही परिस्थितीत रक्तदान करण्याची त्यांची ही चिकाटी आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे.

First published: December 11, 2017, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading