भीषण अपघात.. खड्डे चुकवताना पुणे-अक्कलकुव्वा एसटी बस झाली पलटी

भीषण अपघात.. खड्डे चुकवताना पुणे-अक्कलकुव्वा एसटी बस झाली पलटी

नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात झाले खड्डे आहे. हा मार्ग मृत्यूचा सापळा असून खड्ड्यामुळे रोज अपघात होत आहे.

  • Share this:

बब्बू शेख,(प्रतिनिधी)

मनमाड,10 नोव्हेंबर : पुणे-अक्कलकुवा एसटी बसला मनमाडजवळ अपघात झाला या अपघातात 15 ते 18 प्रवासी जखमी झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकाचा बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. नगर-इंदूर महामार्गावर रविवारी पहाटे हा अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून अक्कलकुव्वाकडे जाणाऱ्या एसटी बसला नगर-इंदूर महामार्गावर मनमाडजवळ भीषण अपघात झाला. त्यात 15 ते 18 प्रवासी जखमी झाले आहे. सर्व जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. खड्डे चुकवताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटी झाली. अपघात झाला तेव्हा बसमध्ये 40 प्रवासी होते. अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्यामुळे अनकवाडे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. प्रवाशांना किरकोळ मार लागला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात झाले खड्डे आहे. हा मार्ग मृत्यूचा सापळा असून खड्ड्यामुळे रोज अपघात होत आहे.

चालकाला डुलकी ट्रॅक्टरवर पिकअप आदळून पाच वारकरी ठार...

चालकाला डुलकी लागल्याने महिंद्रा पिकअप ट्रॅक्टर आदळल्याने कार्तिक वारीसाठी पंढरपूरकडे जाणारे पाच वारकरी ठार झाले. अन्य पाच वारकरी गंभीर जखमी झाले. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास सांगोला येथे पंढरपूर रस्त्यावरील मांजरीजवळ हा अपघात झाला. कार्तिक वारीनिमित्त मंडाेली (ता. बेळगाव) येथून दहा वारकरी महिंद्रा पिकअपमधून गुरुवारी रात्री पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास सांगोला येथे चहा घेऊन ते पंढरपूरकडे निघाले. मांजरीजवळ शब्बीर मुलाणी यांच्या घरासमोर विटा भरून सांगाेल्याकडे निघालेला ट्रॅक्टर चुकीच्या दिशेने जाऊन पिकअपवर धडकला. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्यांमध्ये विटा होत्या. अपघातानंतर चालकाशेजारी बसलेले परशुराम दळवी जागे झाले. चालक यल्लप्पा देवाप्पा पाटील (रा. हंगरगा, ता. बेळगाव) हा जखमी अवस्थेत रोडच्या कडेला बसला होता. तेथेच त्याचा मृत्यू झाला. कृष्णा कणबरकर, लक्ष्मण ऊर्फ टेलर परशुराम आंबेवाडीकर, महादेव कणबरकर, अरुण मुतेकर हे जागीच ठार झाले. गणपत दळवी, गुड्डू तरळे, मात्रू साळवी, वैजू कणबरकर, दिलीप शेरेकर (सर्व रा. मंडाेली, ता. बेळगाव) हे जखमी झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: November 10, 2019, 9:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading