राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा मार्ग मोकळा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा मार्ग मोकळा

  • Share this:

cv rao 427 सप्टेंबर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारली आहे.

राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा घेतल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्विकारला आहे.

पण पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पृथ्वीराज चव्हाण काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहे. आता राज्यपालांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. केंद्रीय मंत्रिमंडळाची संध्याकाळी बैठक झाली. त्यात ही शिफारस स्वीकारण्यात आला. आता राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल.

Follow @ibnlokmattv

First published: September 27, 2014, 9:48 PM IST

ताज्या बातम्या