ऊस दर आंदोलन:मुख्यमंत्री घेणार राजू शेट्टींची भेट

ऊस दर आंदोलन:मुख्यमंत्री घेणार राजू शेट्टींची भेट

  • Share this:

oos25 नोव्हेंबर : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडमध्ये प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाथीस्थळी पोहोचून आदरांजली वाहिली आहे. उस दरासाठीचे आंदोलन बाबत मुख्यमंत्री राजू शेट्टींना दुपारी 2 वाजता भेटण्याची माहिती मिळाली आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कराडमध्ये ऊसदरासाठी आंदोलन सुरू केले आहे. शहरातल्या सर्व संवेदनशील ठिकाणी जास्त कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व आंदोलकांना समाधिस्थळापासून 7 किलोमीटर अंतरावर थांबवण्यात आले आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था पाहता, काही गंभीर प्रसंग उद्भवण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले राजू शेट्टींच्या भेटीला गेले असून त्यांनी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दरवाढीबद्दलच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराच्या आंदोलनाबाबत निर्णायक लढा पुकारण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज कराडमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह जमले आहेत. काल मुंबईतली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातले स्वाभिमानीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले असून ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात येते आहे. शनिवारी रात्री 12च्या सूमारास वारणा साखर कारखान्याचं शेरी पार्कमधले शेती कार्यालय पेटवण्यात आले असून सांगली जिल्ह्यातही अनेक एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. तर पंढरपूर तालुक्यात ऊस वाहून नेणारा एक ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी पेटवून दिला.

दरम्यान आज कराडमध्ये राज्यातल्या अनेक भागांमधून कार्यकर्ते येणार असून त्यापार्श्वभूमीवर कराड शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच आज 'कराड बंद'चे ही आवाहन करण्यात आले आहे.

First published: November 25, 2013, 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading