22 नोव्हेंबर : मुख्यमंत्र्यांकडे फाईल पेंडिग राहतात या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगलाय. आर.आर.पाटील यांना एक फाईल लागत होती मात्र फाईल देण्यास टाळाटाळ केला जात होता. यावर आबा चांगलेच चिडले. अखेर ते चिडल्यामुळे ती फाईलपुढे सरकरली. चिडल्याशिवाय फाईल्स पुढे सरकतच नाहीत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाळ्यात ते बोलत होते. त्यांच्या विधानाला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिलंय. एखाद्या खात्यातील मंत्र्यांने फाईल मागितली तर ती एका पक्षाची नाही तर संपूर्ण सरकारची आहे. राष्ट्रवादीकडेही फाईल पेंडिग राहत असतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे फास्ट काम करता आणि काँग्रेसचे करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे असा प्रतिटोला राणेंनी लगावला.