Home /News /maharashtra /

जिद्दीला सलाम! लॉकडाऊनआधी होती 10 हजारांची नोकरी, आता कमावतोय दरमहा 80000

जिद्दीला सलाम! लॉकडाऊनआधी होती 10 हजारांची नोकरी, आता कमावतोय दरमहा 80000

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे सामान्यातील सामान्य माणूस ते अगदी बलाढ्य अर्थव्यवस्था सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही माणसं जिद्दीने उभी राहत आहेत.

    औरंगाबाद, 24 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे सामान्यातील सामान्य माणूस ते अगदी बलाढ्य अर्थव्यवस्था सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही माणसं जिद्दीने उभी राहत आहेत. त्यांच्या कहाणीमुळे अनेकांना प्रोत्साहन देत आहेत. औरंगाबादमधील (Aurangabad) कलाशिक्षक असणाऱ्या महेश कापसे यांची देखील अशीच काहीशी कहाणी आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली, ज्यामधून त्यांना दरमहा 10 हजार रुपये मिळत असत. मात्र आता ते कलेच्या जोरावर महिन्याला 80 हजार रुपये कमावत आहेत. महेश कापसे यांना सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळाली. त्यांनी सुरुवातीच्या काळात सोशल मीडियावर त्यांची चित्रं पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. मोकळ्या वेळातील त्यांचा हा छंद त्यांच्या उपजिवीकेचे साधन बनला. त्यांच्या चित्रांचं विविध ठिकाणी कौतुक झालं. अभिनेता रितेश देशमुख याने देखील त्यांच्या चित्रांचे कौतुक केले आहे. सध्या महेश यांची महिन्याची कमाई 80 हजार आहे.  लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे. सुरुवातीला महेश यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे चित्र काढण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच त्यांना ऑर्डर मिळण्यास सुरुवात झाली. महिन्याला 40 ऑर्डर त्यांना सहज मिळतात आणि प्रत्येक ऑर्डरमागे दोन हजार इतकंच शुल्क ते आकारतात. केवळ 10 मिनिटात चित्र काढण्याच्या त्यांच्या कौशल्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (हे वाचा-चांदी खरेदी करण्याची बेस्ट वेळ!सणासुदीच्या काळात गुंतवणूक केल्यास मिळेल मोठा नफा) लॉकडाऊनमध्ये औंरगाबाद याठिकाणी असणाऱ्या शाळेतील त्यांची नोकरी गेली. त्यांनी मग बुलडाणा या मुळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. फावल्या वेळात त्यांनी काही पेंटिंग्ज बनवली आणि ती टिकटॉकवर पोस्ट करण्यास सुरुवात केली. आता त्यांचे व्हिडीओ अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट केले आहेत. केवळ रितेशच नव्हे तर क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन यांनी देखी त्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
    महेश यांच्या कुटुंबीयांनी देखील त्याच्या या यशाबद्दल कौतुक केले आहे. मात्र सध्या एक नवीन समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे टिकटॉक बॅन झाल्याने पूर्वीइतके त्यांचे व्हिडीओ प्रसिद्ध होत नाही आहेत. इतर सोशल मीडियावर इतकीशी प्रसिद्धी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तरीही या तरुणाने जिद्द सोडली नाही आहे. महेश यांनी आजही त्यांचे काम नेटाने सुरु ठेवले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या