शूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं

शूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं

खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका आर्ट डायरेक्टरचा जागेवर मृत्यू झाला

  • Share this:

भिवंडी, 24 सप्टेंबर: भिवंडी-वसई मार्गावरील खड्ड्यांनी आणखी एकाचा बळी घेतला आहे. खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका आर्ट डायरेक्टरचा जागेवर मृत्यू झाला आहे.  हर्ष विनोद सिंह (26, रा. ठाणे ) असं मृत तरुणाचं नाव आहे. नायगाव येथील शूटिंगचे लोकेशन पाहून वसई-भिवंडी मार्गाने ठाण्याला घरी जाताना हर्षवर मृत्यू ओढवला.

हेही वाचा...व्हॉट्सअ‌ॅप चॅट कारवाईसाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही, उज्ज्वल निकम यांचा खुलासा

मिळालेली माहिती अशी की, भिवंडी-वसई रोडवरील कालवार गेट परिसरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. रस्त्यावर खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. दरम्यान, याच मार्गानं नायगाव येथील शूटिंगचे लोकेशन पाहून आर्ट डायरेक्टर हर्ष विनोद सिंह हा घरी निघाला होता. मात्र, त्याची दुचाकी खड्ड्यात आदळून दुभाजकाला धडकली. या अपघातात हर्षचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी नोंद करण्यात आली आहे.

सध्या मुंबईसह उपनगर तसेच ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात भिवंडी-वसई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

विकी डोनर फेम अभिनेत्याचे निधन

दुसरीकडे, विकी डोनर फेम अभिनेता भुपेश कुमार पांड्या (Bhupesh Kumar Pandya) यांचे निधन झालं. दीर्घकाळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. बुधवारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National School of Drama) अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली. NSD ने त्यांच्या ट्वीट मध्ये असे लिहले होते की, 'विख्यात रंगकर्मी भूपेश कुमार पांड्या ( माजी विद्यार्थी एनएसडी 2001 बॅच ) यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी अतिशय दुःखदायक आहे.

फुप्फुसाच्या कर्करोगामुळे पांड्या यांचे निधन झाले. गेले काही महिने ते या आजाराशी लढत होते. एनएसडीचे माजी विद्यार्थी असणाऱ्या भुपेश पांड्या यांच्या जाण्याने त्यांच्या सहकलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी, गजराज राव यांनी भुपेश यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काही दिवसांपूर्वी भुपेश यांच्या मित्राने त्यांच्या उपचारासाठी निधी आवश्यक असल्याचे शेअर केले होते. त्यांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी हा निधी आवश्यक होता. अभिनेता मनोज वाजपेयीने देखील याबाबत ट्वीट शेअर केले होते. या फंडरेजर वेबसाइटनुसार गजरावर राव यांनी 25 हजारांची मदत केली होती.

हेही वाचा...सुशांत केस: आता तुरुंगातही शौविक चक्रवर्तीची चौकशी, NCBला कोर्टाची परवानगी

भुपेश यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ते कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये होते. अहमदाबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. भुपेश यादव यानी विकी डोनर, हजारो ख्वाहिशे ऐसी यामध्ये काम केले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 9:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading