मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संभाजी भिडेंविरोधात अटक वॉरंट, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

संभाजी भिडेंविरोधात अटक वॉरंट, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

या आधीही संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले होते.

या आधीही संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले होते.

या आधीही संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले होते.

  • Published by:  Ajay Kautikwar
कोल्हापूर 8 फेब्रुवारी : शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. गेल्यावर्षी 13 एप्रिल 2018 या दिवशी बेळगाव जवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी संभाजी भिडे हे प्रमुख पाहुणे होते. आचारसंहिता लागू असतानाही भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आपल्या भाषणातून विधान केलं होतं, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संभाजी भिडे यांच्यासह नऊ जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावणीवेळी संभाजी भिडे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी करण्यात आले आहे, दरम्यान या संदर्भातली पुढची सुनावणी येत्या 24 मार्चला होणार आहे. या आधीही संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले होते.
First published:

Tags: Sambhaji bhide

पुढील बातम्या