• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BHR BANK घोटाळ्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत, डायरीमुळे अनेक नावं समोर येण्याची शक्यता

BHR BANK घोटाळ्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत, डायरीमुळे अनेक नावं समोर येण्याची शक्यता

कंडारेच्या अटकेमुळे अनेक मोठी मासे गळ्याला लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात 230 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असलेल्या डायरीचा समावेश आहे.

  • Share this:
जळगाव, 29 जून :   भाईचंद हिराचंद रायसोनी बँक घोटाळा (bhaichand hirachand raisoni bank)  प्रकरणी अखेर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या (pune crimes branch) च्या तपासाला यश आले आहे. प्रमुख आरोपी जितेंद्र कंडारे याला अटक करण्यात आली आहे. बीएचआर पथसंस्थेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या प्रमुख आरोपी जितेंद्र कंडारे याला अटक पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं सोमवारी रात्री अटक केली आहे.  इंदुर इथं लपून बसलेल्या कंडारे याच्या पुणे आर्थिक विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. कंडारे हा बँकेचा आवसायक होता. करोडो रुपयांच्या जमिनीची कवडीमोल विक्री करण्यामागे हाच मुख्य सूत्रधार होता. Twitter नं हटवला भारताचा चुकीचा नकाशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख दाखवलेला वेगळा देश कंडारेच्या अटकेमुळे अनेक मोठी मासे गळ्याला लागण्याची शक्यता आहे.  या प्रकरणात 230 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असलेल्या डायरीचा समावेश आहे.   ही डायरी कुणाची ? याविषयी गूढ कायम आहे. तसंच,  हे पैसे आले कुठून आणि कुठे व्यवहार झाला याचा तपास सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी  पुणे आर्थिक गुन्हे  शाखेनं कारवाईचा बडगा उगारत जळगाव जिल्ह्यातील मोठे व्यापारी तसेच राजकीय जवळीक असलेल्या 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे.  या पतसंस्थेमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जास्त पगार की घरात मदत काय हवं? बायकोनेच ठरवावं आता काय हवं या पतसंस्थेनं जप्त केलेल्या मालमत्ता अगदी कवडीमोल किंमतीत विकल्या आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कागदपत्र जप्त केली. या प्रकरणी पोषण आहाराचे मोठे ठेकेदार सुनील झंवर यांच्या कार्यालायचीही झडती घेण्यात आली होती. याआधीही 'बीएचआर'च्या अपहार प्रकरणी राज्यभरात चेअरमनसह अनेकांवर गुन्हे दाखल आहे.
Published by:sachin Salve
First published: