लष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा?

लष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा?

सुदैवानं या अपघातत कुठलीही जिवीत हानी झाली नसून गाडीमध्ये असलेल्या सामानाचही नुकसान झालं नसल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे.

  • Share this:

नागपूर, ता.13 नोव्हेंबर : लष्करी जवानांना घेऊन जाणारी एक स्पेशल ट्रेन मंगळवारी नागपूरजवळ रूळावरून घसरली. या ट्रेनमध्ये शस्त्रसाठा आणि दारूगोळा असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सुदैवानं या अपघातत कुठलीही जिवीत हानी झाली नसून गाडीमध्ये असलेल्या सामानाचही नुकसान झालं नसल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे.

ही स्पेशल ट्रेन गुवाहाटीवरून आंध्र प्रदेशातल्या बापटला इथं जात होती. नागरपूर रेल्वे स्टेशनजवळच्या डी केबिनजवळ या गाडीचे काही चाकं रूळावरून घसरले. त्यामुळं तातडीनं गाडी थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वेला रूळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ही गाडी वेगळ्या ट्रॅकवर असल्याने अपघातामुळं प्रवासी वाहतूकीला अडथळा झालेला नाही. सर्व वाहतूक सुरळीत सुरू असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय. नियमित कामकाजाचा भाग म्हणून ही ट्रेन जात होती. या गाडीत काही जवानही होते. या खास गाडीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असून चिंतेचं काहीही कारण नाही असंही प्रशासनाने स्पष्ट केलंय.

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल!

 

First published: November 13, 2018, 4:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading