महाराष्ट्रातल्या 23 वर्षांच्या जवानाचा सीमेवर हृदयविकाराने मृत्यू

महाराष्ट्रातल्या 23 वर्षांच्या जवानाचा सीमेवर हृदयविकाराने मृत्यू

सुरज आसाममध्ये तैनात होता. तो ड्युटीवर असतानाच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचं निधन झालं.

  • Share this:

कोल्हापूर, 25 मार्च : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या गिरगावमध्ये आज अभिमानाचा हुंदका आणि आठवणींचे अश्रू दाटून आले. या गावातील अवघ्या 23 वर्षीय जवानाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. सुरज साताप्पा मस्कर असं या वीराचं नाव आहे.

सुरज आसाममध्ये तैनात होता. तो ड्युटीवर असतानाच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचं निधन झालं. एवढ्या तरुण वयात ह्रदयविकार आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरज शारिरीकदृष्ट्याही तंदुरुस्त होता. त्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय. सुरजच्या निधनाने त्याचं गाव शोकसागरात बुडालं आहे.

गिरगावमध्ये गेल्या 60 वर्षांपासून सैनिकी परंपरा असलेल्या या गावात आज सकाळी सुरजचं पार्थिव आलं आणि गावकऱ्यांनी एकच हंबरडा फोडला. सुरज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

सूरजचा लहान भाऊ सैन्यात आहे, तर त्याचे वडील आणि आजोबाही देशसेवा बजावून परतले आहेत. सुरजचं लग्न होऊन दीड-दोन वर्ष झाले आहेत. त्याच्या मागे 8 महिन्यांची निरागस चिमुकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2019 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading