मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आई-बाबा, बहिण, बायको सगळेच दरडीखाली सापडले, तळीये गावाच्या जवानावर दुखाचा डोंगर

आई-बाबा, बहिण, बायको सगळेच दरडीखाली सापडले, तळीये गावाच्या जवानावर दुखाचा डोंगर

mahad taliye gaon : दुर्दैवाची बाब म्हणजे, गेल्यावर्षीच अमोल कोंडाळकर यांचं लग्न झालं होतं. लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करणारे जवान अमोल कोंडाळकर आज एकटे पडले आहे.

mahad taliye gaon : दुर्दैवाची बाब म्हणजे, गेल्यावर्षीच अमोल कोंडाळकर यांचं लग्न झालं होतं. लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करणारे जवान अमोल कोंडाळकर आज एकटे पडले आहे.

mahad taliye gaon : दुर्दैवाची बाब म्हणजे, गेल्यावर्षीच अमोल कोंडाळकर यांचं लग्न झालं होतं. लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करणारे जवान अमोल कोंडाळकर आज एकटे पडले आहे.

रायगड, 24 जुलै : रायगड जिल्ह्यातील (Extreme heavy rainfall)  तळीये गावात (mahad taliye gaon) झालेल्या दुर्घटनेमध्ये 38 जणांना आपला जीव गमवावा लागला. या भयावह दुर्घटनेत अनेकांच्या संसार उद्धवस्त झाले आहे. एकाच वेळी गावातील 38 जणांच्या मृत्यूमुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे. याच दुर्घटनेत देशासाठी सैन्यात गेलेले अमोल कोंडाळकर यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कोंडाळकर यांचं संपूर्ण कुटुंब दगावले आहे.

दूर्घटनाग्रस्तं तळीये गावातील सैन्याचे जवान अमोल कोंडाळकर यांच्यासोबत नियतीने क्रुर थट्टा केली आहे. तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, बहीण आणि बायको असे चार जणं दरडीखाली येऊन दगावले आहे.

आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल, बीडमध्ये एकच खळबळ

अमोल कोंडाळकर हे वरीष्ठ पदाच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आहे. त्यामुळे दुर्दैवी दुर्घटनेतून ते बचावले. दुर्दैवाची बाब म्हणजे, गेल्यावर्षीच अमोल कोंडाळकर यांचं लग्न झालं होतं. लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करणारे जवान अमोल कोंडाळकर आज एकटे पडले आहे.

आर्मीच्या जवानाची वर्दी घालून ते देशाची सेवा करत आहेत, पण स्थानिक प्रशासनातील वर्दी घातलेल्या माणसांनी आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी प्रामाणिकपणे केली असती तर आज ही वेळ आली नसती अशी खंतही त्यांनी व्यक्तं केली.

तळीये दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्तं तळीये गावाला भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी आपलं कुटुंब गमावलेल्या गावकर्यांशी संवाद साधून त्यांचं सांत्वनही केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबातील 6 जणांना गमावलेल्या विजय केशव पांडे यांचं सांत्वन केलं.  विजय केशव पांडे यांचे आई-वडील, बहीण, बायको, ६ महिन्यांचा मुलगा आणि 10 वर्षाची मुलगी असे कुटुंबातील ६ जणं दगावली आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील तळीये गावात झालेल्या दरड दूर्घटनेत मोठी जीवीतहानी झाली आहे. त्यामुळे तळीये गावा शेजारील अनेक गावांतील गावकरीही भयभीत झाले आहे. त्यामुळे अनेक अफवाही सध्या रायगडमध्ये पसरत आहेत. तसंच सह्याद्री पर्वत रांगांमध्ये धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या गावकऱ्यांचंही योग्य पुर्नवसन करण्याची योजना असल्याचं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.

First published: