मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशकातही शस्त्राची तस्करी, पोलिसांनी कसली कंबर

मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशकातही शस्त्राची तस्करी, पोलिसांनी कसली कंबर

नाशिक शहरात शस्त्र तस्करी करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. यंदाच्या सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी)

नाशिक, 3 सप्टेंबर: मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशकातही शस्त्राची तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. उत्सव काळात अशा टोळ्यांना गजाआड करण्यासाठी नाशिक पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. गावठी कट्टे आणि पिस्तूल यासारख्या शस्त्रांची तस्करी करणारी टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

नाशिक शहरात शस्त्र तस्करी करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. यंदाच्या सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. पिस्तूल, गावठी कट्टे तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक पोलीस युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे. एकूण तीन जणांना शहर परिसराच्या भद्रकाली, जेलरोड आणि औरंगाबाद रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, सात देशी पिस्टूल आणि वीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील अमराठी येथून या कट्टयांची तस्करी आरोपी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलीस आयुक्तविश्वास नागरे पाटील यांनी सांगितले आहे.

या संदर्भात आता नाशिक पोलीस अटक केलेली आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या याप्रकरणात टोळीतील आणखी धागे दोरे पुढे येण्याची शक्यता असून आणखी आरोपी आणि शस्त्रांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पंढरपूर हादरलं! तरुणाकडे सापडली बंदूक आणि 5 जिवंत काडतूसं

पंढरपूर शहरात ऐन गौरी-गणपती सणाच्या काळातच एका तरूणाकडून रिव्हॉल्वर आणि 5 जिवंत काडतूसं पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गणपतीच्या सणामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण आहे. त्यात असा शस्त्रसाठा सापडल्यामुळे काही मोठा कट रचण्याचा प्लान होता का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पंढरपूर इथल्या शिवराज उर्फ भैय्या बाळासाहेब ननवरे (वय 22) या नामक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये पंढरपूर शहरात भुरट्या चोऱ्या, हाणामारी आणि गुन्ह्यांचे प्रकार घडत असल्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. या सगळ्यावर कारवाई करतानाचा हा प्रकार घडला आहे.

SPECIAL REPORT: हडपसरमधील भाजप आमदाराची वाट खडतर; विरोधकांकडून जोरदार आव्हान

First published: September 3, 2019, 3:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading