VIDEO : फडणवीस म्हणाले, वाद सोडून द्या! त्यावर खोतकरांचं उत्तर होतं...

VIDEO : फडणवीस म्हणाले, वाद सोडून द्या! त्यावर खोतकरांचं उत्तर होतं...

शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

जालना, 4 फेब्रुवारी : 'अर्जुनराव आपले घरातील भावभावनांचे भांडण आहे. आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आता वाद सोडून द्या,' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील सेना-भाजप संघर्ष संपवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा संघर्ष टाळण्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

खोतकरांचं उत्तर

'मला जनतेनेच उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. त्यामुळे मी आता खूप पुढे गेलोय. माझी उमेदवारी पक्किच आहे,' असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही आपण रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात काल (रविवारी) एकमेकांवर सतत टीकास्त्र सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेदेखील या दोन नेत्यांबरोबर मंचावर उपस्थित होते.

'शेळ्या-मेंढ्यावाला विभाग म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या विभागाला देशपातळीवर पशु-प्रदर्शनातून ओळख करून देण्याचं काम मी केलं,' असं म्हणत अर्जुन खोतकरांनी दानवे यांना टोला लगावला.

VIDEO : ...जेव्हा आदित्य ठाकरेंच्या मंचावर दोन कट्टर विरोधक एकत्र येतात

First published: February 4, 2019, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading