• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'मी कारखान्याचा फक्त 70 लाखांचा शेअर होल्डर', किरीट सोमय्यांच्या आरोपांवर खोतकरांचं स्पष्टीकरण

'मी कारखान्याचा फक्त 70 लाखांचा शेअर होल्डर', किरीट सोमय्यांच्या आरोपांवर खोतकरांचं स्पष्टीकरण

अर्जुन खोतकरांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळले

अर्जुन खोतकरांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळले

"किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेले आरोप हे धांदात खोटे आहेत. मी कारखान्याचा मालक नसून फक्त 70 लाखांपर्यंतचा शेअर होल्डर आहे", असं अर्जुन खोतकरांनी (Arjun Khotkar) स्पष्ट केलं आहे.

  • Share this:
औरंगाबाद, 19 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खोतकरांनी जालन्याच्या रामनगर साखर कारखाना बेनामी पद्धतीने विकत घेत तब्बल 100 कोटींचा घोटाळा (100 crore rupees scam) केला, असा गंभीर आरोप (allegations) सोमय्यांनी केला आहे. या आरोपांवर खोतकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "सोमय्या यांनी केलेले आरोप हे धांदात खोटे आहेत. मी कारखान्याचा मालक नसून शेअर होल्डर (Share Holder) आहे", असं खोतकरांनी स्पष्ट केलं आहे.

अर्जुन खोतकर नेमकं काय म्हणाले?

"किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे धांदात खोटे आहेत. जे खरं आहे ते सर्व रेकॉर्डवर आहे. मी त्या कारखान्यात फक्त 70 लाखांपर्यत शेअर होल्डर म्हणून आहे. मी कारखान्याचा मालक नाही. तो कारखाना मी विकत घेतलेला नाही. त्या भागातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सुरु व्हावा म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे", अशी प्रतिक्रिया खोतकरांनी दिली. तसेच किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, असंही ते म्हणाले. हेही वाचा : अर्जुन खोतकरांनी 100 कोटींचा घोटाळा केला, किरीट सोमय्यांचा मोठा आरोप "मी नेमका राजकारणात पदार्पण करत असेल त्यावेळी कारखाना उभा राहिला आहे. जिल्हाधिकारी, शासनाच्या परवानगीने ही जमीन दिलेली आहे. त्यांना कारखाना हवा असेल तर मी मालकाशी बोलतो. जमीनीसह त्यांना आम्ही 100 कोटी रुपयात कारखाना द्यायला तयार आहोत", असं खोतकर म्हणाले.

'किरीट सोमय्या आमचे मित्र'

"किरीट सोमय्या आमचे मित्र आहेत. हे किरीट सोमय्या बोलत नाहीयत. तर त्यांना दुसरं कुणीतरी बोलायला लावत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितल्यानुसार सोमय्यांनी आरोप केले आहेत", असा दावा खोतकरांनी केला.

किरीट सोमय्या यांचे नेमके आरोप काय?

किरीट सोमय्या यांनी खोतकरांवर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप केला आहे. खोतकरांनी रामनगर साखर कारखाना हा बेनामी घेतला. तसेच त्यांनी शेतकऱ्यांची 1 हजार कोटींची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, असे गंभीर आरोप सोमय्यांनी केले आहेत. हेही वाचा : आदित्य ठाकरेंसाठी सोडली जागा आता मिळाली आमदारकीची संधी, रामदास कदमांचा पत्ता कट "राज्य सरकारची 100 एकर जमीन बळकवण्याचा अर्जुन खोतकर यांचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांनी जी जमीन कारखान्यासाठी दिली आहे त्याची आज मार्केट वॅल्यू 1 हजार कोटींच्या आसपास आहे. साखर कारखाना तर कधी चालू झालाच नाही. कामगाराचे पैसेही दिले नाही. पण त्या जागेवर बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉम्पलेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारी मी ईडीपासून राज्य मंत्रालयापर्यंत दिल्या", असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. तसेच खोतकरांनी रामनगर साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला, असं सोमय्या म्हणाले आहेत.
Published by:Chetan Patil
First published: