मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दसरा मेळाव्यासाठी काहीपण! बंद असलेला समृद्धी महामार्ग उद्घाटनाआधीच खोतकरांसाठी खुला

दसरा मेळाव्यासाठी काहीपण! बंद असलेला समृद्धी महामार्ग उद्घाटनाआधीच खोतकरांसाठी खुला

बंद असलेला समृद्धी महामार्ग अर्जुन खोतकर यांच्यासाठी खुला

बंद असलेला समृद्धी महामार्ग अर्जुन खोतकर यांच्यासाठी खुला

समृद्धी महामार्गाचं अद्याप उद्घाटन झालेलं नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसाठी उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला करण्यात आल्याचं चित्र आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalna, India
  • Published by:  Chetan Patil

जा्लना, 4 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्या खूप मोठा दिवस असणार आहे. कारण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन्हींच्या नेतृत्वातील दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही गटाच्या बाजूने दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) मैदानावर होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा हा मुंबईच्या बीकेसी मैदानात होणार आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला गर्दी म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते राज्यभरातून आज मुंबईत दाखल होत आहेत. शिंदे गटाकडून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन नियोजन करण्यात आलं आहे. या घडामोडींमधील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नेत्यांना देण्यात येत असलेली मुभा. समृद्धी महामार्गाचं अद्याप उद्घाटन झालेलं नाही. त्यामुळे हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी बंद आहे. पण शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग आज खुला करण्यात आला.

समृद्धी महामार्गाचं अद्याप उद्घाटन झालेलं नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसाठी उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला करण्यात आल्याचं चित्र आहे. कारण सर्वसामान्यांसाठी हा महामार्ग अजूनही बंद आहे. पण याच महामार्गावर काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सहभागी झालेल्या अर्जुन खोतकरांची रॅली दिसली. मुंबईत शिंदे गटाकडून बीकेसी मैदानात भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यासाठी अर्जुन खोतकर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जालन्याहून मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी वैजापूरपर्यंत समृद्धी महामार्ग खुला करण्यात आला आहे. खोतकर यांचा ताफा समृद्धी महामार्गाने 120 ते 130 किमीचं अंतर कापत मुंबईच्या दिशेला रवाना झाला आहे.

(एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात ठाकरेंना आणखी धक्के देणार? 24 तास आधी म्हणाले...)

समृद्धी महामार्गाचं उद्घाटन गेल्या अनेक दिवसांपासून होऊ शकलेलं नाही. अनेकदा कामाच्या दर्जा, काम सुरु असताना झालेल्या दुर्घटना यामुळे समद्धी महामार्गाचं उद्घाटन कायम पुढे पडत गेलं. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अजूनही हा महामार्ग खुला करण्यात आलेला नाहीय. मात्र, दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे येत असताना अर्जुन खोतकर यांचा ताफा याच महामार्गावरुन रवाना झाला. याचाच अर्थ जो महामार्ग सर्वसामान्यांसाठी बंद आहे तो महामार्ग नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सुरु असल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Maharashtra government, Maharashtra political news, Maharashtra politics