जालना, 3 फेब्रुवारी : एकमेकांवर सतत टीकास्त्र सोडणारे भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेदेखील या दोन नेत्यांबरोबर मंचावर उपस्थित होते. शेळ्या-मेंढ्यावाला विभाग म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या विभागाला देशपातळीवर पशु-प्रदर्शनातून ओळख करून देण्याचं काम मी केलं, असं म्हणत खोतकरांनी दानवे यांना टोला लगावला.