अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आमदारकी कायम राहणार

अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आमदारकी कायम राहणार

सुप्रीम कोर्टाने अर्जुन खोतकर यांना दिलासा देत आमदारकी रद्द करणाचा मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलीये.

  • Share this:

08 डिसेंबर : शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने अर्जुन खोतकर यांना दिलासा देत आमदारकी रद्द करणाचा मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलीये. त्यामुळे अर्जुन खोतकर यांची आमदारकी अबाधीत राहणार आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्याविरूद्ध  याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती. तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात अर्जुन खोतकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

अर्जुन खोतकर यांच्या वतीने ख्यातनाम वकील हरीश साळवे तर कैलास गोरंट्याल यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. भारतातील दोन दिग्गज वकील ही केस लढत होते त्यामुळे सुप्रीम कोर्टात या केसबद्दल मोठी उत्सुकता होती.

अखेर हरीश साळवे यांच्या अचून युक्तिवादाने अर्जुन खोतकर यांना मोठा दिलासा मिळालाय. आता मार्च २०१८ च्या पहिल्या आठवड्यात अर्जुन खोतकर विरूद्ध कैलास गोरंट्याल खटल्याची पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 07:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading